परतावा धोरण (Refund and Returns Policy)
अद्ययावत: गुरुवार, दिनांक 22 मे 2025.
आमच्या वेबसाइट www.sahyadrimarathi.com (यानंतर “सह्याद्री मराठी”, “आम्ही”, “आमचे” असे उल्लेख) वर सेवा खरेदी केल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. कृपया खालील धोरण व आमच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा. हे धोरण तुम्ही आमच्याकडून घेतलेल्या सेवांशी संबंधित हक्क आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करते.
परतावा / रिफंडसंदर्भातील धोरण:
-
सेवेतील त्रुटीमुळे परतावा:
जर आपण घेतलेल्या सेवेबाबत स्पष्ट आणि दर्शनी त्रुटी असेल व ती आमच्या बाजूने झालेली चूक असेल, तर परतावा विचारात घेतला जाईल.
-
मन: परिवर्तन (Change of Mind):
- ग्राहकाने सेवेबाबत मन बदलल्यास, ते त्यांनी २४ तासांच्या आत आम्हाला कळवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत एकूण रकमेपैकी २५% रक्कम वजा करून उर्वरित रक्कम परत केली जाईल.
- २४ तासांनंतर फक्त मन बदलल्यामुळे परतावा स्वीकारला जाणार नाही, कारण तो आमच्या चुकीमुळे नसतो.
-
GST परतावा:
सेवा मूल्यावरील GST (वस्तू व सेवा कर) परतावा दिला जाणार नाही.
-
काम सुरू किंवा पूर्ण झाल्यानंतर:
एकदा सेवा शेअर / पूर्ण झाल्यावर आणि ग्राहकाने ती स्वीकारल्यास, मन बदलल्यामुळे कोणताही परतावा केला जाणार नाही. मात्र, ग्राहकाने भरलेली रक्कम दुसऱ्या तत्सम मूल्याच्या सेवेसाठी वापरता येईल, पूर्ण किंवा अंशतः.
-
३० दिवसानंतर परतावा:
सेवा खरेदी केल्यानंतर ३० दिवसांनंतर केलेली परताव्याची विनंती वैध मानली जाणार नाही, विशेषतः जर संबंधित सेवा पूर्ण केल्याचे आमच्याकडून ईमेल, फोन किंवा इतर माध्यमातून कळवले गेले असेल.
परतावा प्रक्रिया:
- जर परताव्याची विनंती सह्याद्री मराठीने मान्य केली, तर परतावा प्रक्रियेस कमाल ३० कार्यदिवस लागू शकतात.
- परताव्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- ही संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडली जाईल.
कायदेशीर पुष्टी व पूरक सूचना:
- हे धोरण भारतीय ग्राहक संरक्षण कायदा, २०१९, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ४२ व नियमानुसार तयार करण्यात आले आहे.
- ग्राहकांचे हक्क आणि तक्रारींसाठी, ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक १९१५ किंवा https://consumerhelpline.gov.in येथे संपर्क साधू शकतात.